डॉक्टर मला हार्ट अटैक येवू शकत नहीं,ती ओरडली ,२५ व्या वर्षीं कोणीही हार्ट अटैक एक्सपेक्ट करत नाही, पण तीचे सगळे रिपोर्ट्स तीला हार्ट अटैक आला हेच दाखवत होते ,हार्ट अटैक कोणालाही आणि कधीही येवू शकतो पण त्यानंतर काय ?
गेल्या १२ वर्ष्याच्या मेडिकल करियर मधे मला हे प्रकर्षाने जाणवलं की आयुष्यात मेडिकल कॉम्प्लीकेशन्स,एक्सीडेंट्स,या गोष्टी सांगून येणार नाहीत , खुप मृत्यु मी जवळून बघितलेत ,कोणाच्या २ महिन्याच्या छकुल्या ते प्रेमळ आई वडील ,बहीन ,अख्ख कुटुंब एक्सीडेंट मधे दगवालेलं बघितलें , मग आपण काय करायचं एक मानुस म्हणून तर आपण फ़क्त जेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे तेवढ छान जगण्याचा प्रयन्त करू शकतो एवढच ,त्यामुळे जगा आणी जगु दया ,स्वताचे आयुष्य सूंदर करन्याचा व मजेत जगण्याचा प्रण करुया
Wednesday, October 17, 2018
Tuesday, October 16, 2018
माझे हॉबी क्लास चे प्रयोग
मी लहान असताना हॉबी क्लास ही संकल्पना नव्हती, आता पालक मुलाला शाळेत टाकतात, coaching क्लास ला टाकतात आणि हॉबी क्लास ला टाकतात, ज्या खेड्यात मी शिकलो तिथे अश्या गोष्टी आम्हाला परीकथा वाटायच्या, पण दहावी पास झालो आणि शहरात आलो तेव्हा हे ज्ञान प्राप्त झाले की या गोष्टी आपण केल्या नाही तर आपले जीवन हे लार्जर द्द्यान लाईफ वैगेरे होणार नाही म्हणुन हॉबी क्लास चा धनु पेल्याण्याचं प्रयोग केले, पोहणं शिकताना शिकवणारा मला वाचवण्या साठी दोन वेळा संपूर्ण कपडे व मोबाईल सहित पाण्यात आला,गिटार शिकल्या गेल्या वर दुसऱ्याच दिवशी मला आत्मज्ञान झालं की हे आपल्याला जमणार नाही, कॉम्प्युटर क्लास, कराटे क्लास ,सिक्स पॅक बनवल्या साठी लावलेली जिम याची पण हीच गत झाली, शेवटी तुकोबा ने म्हटलेच आहे ठेविले अनंते तैसेची राहावे
Monday, October 15, 2018
आयुष्यात पहिल्यांदाच मी ब्लॉग लिहतोय, तेव्हा मनात खूप येतेय की कशाने सुरुवात करावी, खूप topics मनांत येताय, पण मी सुरुवात करणार आहे मी वाचलेल्या पहिल्या पुस्तका बद्दल लिहून, मी वाचलं होतं ते पुस्तक आहे जुनी दहावी चं बाबांचं पुस्तक, त्याच्यात काय नव्हतं बहिनाबाईच्या कविता होत्या, पु. लं चं चितळे मास्टर होते खूप काही होतं आणि तेव्हा पासून वाचनाची आवड आहे ती आतापर्यंत सुरूच आहे, कधी कधी असं वाटतं की हे सर्व सोडून फक्त पुलं किंवा गदिमा वाचतं बसावं, बघूया केव्हा तरी सवडीने
Subscribe to:
Posts (Atom)