मी लहान असताना हॉबी क्लास ही संकल्पना नव्हती, आता पालक मुलाला शाळेत टाकतात, coaching क्लास ला टाकतात आणि हॉबी क्लास ला टाकतात, ज्या खेड्यात मी शिकलो तिथे अश्या गोष्टी आम्हाला परीकथा वाटायच्या, पण दहावी पास झालो आणि शहरात आलो तेव्हा हे ज्ञान प्राप्त झाले की या गोष्टी आपण केल्या नाही तर आपले जीवन हे लार्जर द्द्यान लाईफ वैगेरे होणार नाही म्हणुन हॉबी क्लास चा धनु पेल्याण्याचं प्रयोग केले, पोहणं शिकताना शिकवणारा मला वाचवण्या साठी दोन वेळा संपूर्ण कपडे व मोबाईल सहित पाण्यात आला,गिटार शिकल्या गेल्या वर दुसऱ्याच दिवशी मला आत्मज्ञान झालं की हे आपल्याला जमणार नाही, कॉम्प्युटर क्लास, कराटे क्लास ,सिक्स पॅक बनवल्या साठी लावलेली जिम याची पण हीच गत झाली, शेवटी तुकोबा ने म्हटलेच आहे ठेविले अनंते तैसेची राहावे
No comments:
Post a Comment