काल माझा एक मित्र मला भेटला, नेहमीच्या गप्पांचा फडशा पडल्यावर करिअर, पैसा या दोन गोष्टीवर सुद्धा आमची चर्चा झाली, माझं निवासी डॉक्टरचं आयुष्य, त्याच्यातून मी मुंबईत, माझं आठवड्याला शंभर तासापेक्षा जास्त काम करणं,त्यांच्यात कार्डिओलॉजी सारखी धावपळ असणारी शाखा, नवीन झालेलं लग्न,गावाला एकटे असलेले आई वडील ,यांच्यात खरंच मी जगणं विसरलोय का?कधीतरी मी वाचले होते मरणे आहे सोपे ,जगणे आहे अवघड तरीही प्रत्येक जण करतो आहे धडपड.कदाचित माझ्या सारखे तुमचेही आयुष्य असेल,असेल तर नक्की share करा मला तुमचे अनुभव ऐकायला आवडेल.
No comments:
Post a Comment