Saturday, January 5, 2019

फुलपाखरू

मन हे खरचं अल्लड असतं, न उमगेलेलं एक कोडे असतं, नवीन वर्षात काय करावं आणि काय नाही असं वाटतंय,कधी वाटतं खूप दिवसांची राहिलेली कादंबरी लिहावी, कधी वाटतं गिटार शिकावी, आणि हो ते स्कुबा डायविंग वगैरें राहिले आहेच की! बायको कधी कधी स्वित्झर्लंडला जाऊ का आपण वैगरे म्हणतेच आहे.खरचं नवीन वर्षात एवढं काही करायचं आहे,कोणी विचारतं की नवीन वर्षात काही संकल्प केला का? तर मुळात संकल्प हे नवीन वर्षातच केले पाहिजे हे मला पटत नाही. जेव्हा हवं तेव्हा आपण ते केलं पाहिजे या विचाराचा मी आहे,नवीन वर्षात फक्त एक नक्की करायचं आहे,हा ब्लॉग अखंड चालू ठेवायचा आहे,कारण या मनाच्या फुलपाखराला उडायचा आहे.

No comments:

Post a Comment