Friday, January 11, 2019

भावा विषय खोल आहे

राहुल माझा चांगला मित्र आहे,एका खूप मोठ्या आयटी कंपनीत तो मोठ्या पदावर आहे,त्याच्या वयोगटात भरपूर कमावणारा तो आहे,त्याचा आयुष्य बघून त्याच्या सोबतच्या सर्वाना त्याचा अभिमान वाटावा असा तो आहे,मलाही त्याचा अभिमान आहे,एखाद्या रेसिडेंट डॉक्टर सारखा तो त्याच्या कंपनीत काम करतो,आठवड्याला शंभर तास वगैरे असा काम करतो,सकाळी सात वाजता तो घरून निघतो आणि रात्री उशीरा येतो ,कधी दहा कधी बारा वाजता तो घरी येतो. घरी आल्यावर पण याचं वर्क फ्रॉम होम वगैरे असतंच. विदेशी कंपन्या व त्याचे ग्राहक यांच्या सेवेसाठी याला आपल्या झोपेचं खोबर करावं लागतं.

कुठलाच व्यक्ती हे जास्त वेळ करू शकत नाही, केव्हा ना केव्हा खासगी आयुष्य त्याने बाधित होणारच,राहुलचं ही तसंच काहीसं झालं, नवीन झालेल्या लग्नातलं नवंपन केव्हा गेलं हे त्याला पन कळलं नाही, त्याचा नुसता रोबोट झालाय ,सकाळी लवकर उठून पैश्याच्या नावाखाली आपलं आयुष्य खर्ची घालायचं कोण्या तरी विदेशी कंपनी साठी जिथे त्यानं नोकरी सोडली तर त्याच्या जागी दुसऱ्याला घ्यायला कंपनी ला 24 तास पण लागणार नाही, अश्या या शर्यतीत राहुल पळतोच आहे,जीव सुटेसो धावतोय,पण जगणं जगायचं तो विसारलाय,दोन वर्ष झाली राहुलच्या नोकरीला ,फक्त दोन वर्षात त्यांचं जीवन पूर्णपणे बदललंय, काय होतास तू आणि काय झालास तू असं झालयं,खरोखर हे जगणे राहुलला हवं होतं का ?नाही हे तर दुश्मनाला पण नको, मग राहुलने काय करायला हवं सांगा मला,तुमच्यात पण खूप असे राहुल असतील त्यांनी काय केलयं ,मला सांगा आपली मतं कारण हा विषयचं खोल आहे.

No comments:

Post a Comment