Thursday, January 17, 2019

कोणी येतंय का रे या शाळेत

शाळा म्हट्लं की मला माझी प्राथमिक शाळा बुरकोनी व साई बाबा विद्यालय बुरकोनी आठवतं, त्या रम्य आठवणी, ते बालपण, माझी शाळा मराठी माध्यम शाळा होती, मी दहावी पर्यंत तिथे शिकलो, खरं म्हटलं तर या शाळेने मला घडवलं, नंतर डॉक्टर झाल्यानंतर दोन तीन वेळा मला तिथे जायला मिळालं, पण काल परवाच माझा एक मित्र मला सांगत होता की दोन्ही शाळा बंद होण्यावर आल्यात,मला धक्काच बसला ,कारणही तसंच आहे आता कोणी आपल्या मुलाला मराठी शाळेत टाकायला तयार नाही, तालुक्याला जायला चांगला रस्ता झालयं तर सगळे जण आपापल्या मुलांना तालुक्याच्या मराठी शाळेत टाकतेय, सगळे जण म्हणतात की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला तर समोर मुलांची अडचण होणार नाही, पण ज्या मुलाची मातृभाषाचं पक्की नाही,त्याचं समोर काय होणार, मी मराठी शाळेतून आलो म्हणून तुम्ही पण तिथेच जा असं मी म्हणतं नाही आहे, पण मराठी भाषेतून शिकलात म्हणून तुम्ही समोर जाणार नाहीत,असा जो समज आहे तो मला चुकीचा वाटतो पण यामुळे सगळ्या महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत, अमृतालाही पैजै जिंकू अशी ही माझी मराठी आहे.

No comments:

Post a Comment